प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शनिवार दि.२७ मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्व.पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा आढावा घेत देश स्वातंत्र्य व विकासात मोठे योगदान दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, महाराष्ट्र सुरक्षा बल पर्यवेक्षक उमाजी कणसे, मारुती जाधव, सचिन शेडबाळे, चंद्रकांत साळी, सचिन व्हलेर आदी उपस्थित होते .