प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पेण तालुक्यातील कामार्ली येथील डॉक्टरने रुग्णालयात आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (ता. ९) रात्री घडली. याबाबत पीडित महिलेने पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे.
पीडित महिला पतीला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी गेली. या वेळी डॉक्टरने त्यांना सलाईन लावल्यानंतर महिला झोपी गेली. याच वेळी डॉक्टरने मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पेण पोलिस करीत आहेत
Tags
रायगड जिल्हा