जन्मदात्या बापाचा खून करून मुलाची आत्महत्या

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   चंदगड -सागर मनोहर गावडे (वय 35).याने दारुच्या नशेत मनोहर आप्पाजी गावडे(वय 57) यांचा धारदार शस्त्राने खून करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.

 ही घटना देसाई  वसाहतीत दुपारी घडली.ते मुळचे जांबरे गावचे असून गेल्या वर्षा पासून त्या वसाहतीत रहात होते.सागर हा एका हॉटेलात नोकरी करत होता.त्याने काही कारणास्तव नोकरी सोडून दिली होती.सागर आणि त्याचे वडील मनोहर या दोघांना दारुचे व्यसन होते.त्यांच्या एका पाहुण्याच्या घरी बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता.सर्व जण त्या कार्यक्रमाला गेले होते.रात्री जेवण झाल्यावर झोपण्यासाठी हे दोघे घरी आले.त्याची आई तेथेच थांबली होती.सागरने आपल्या आईला दारुच्या नशेत तुझ्या नवरयाला संपवतो आणि स्वतःली काहीतरी करून घेतो असा बडबडत होता.आज त्याची आई घरी आल्यानंतर नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते आणि मुलगा सागर हा दोरीला लटकताना दिसला.मनोहर यांच्या  ,गळ्यावर आणि डाव्या हाताच्या कोपरावर धारदार शस्त्र वापरुन घाव केल्याचे दिसून आले.या प्रकरणी सागरची आई मिनाक्षी गावडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.मयत सागर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर हा एकुलता एक मुलगा होता त्याचे लग्न ही झाले होते.त्याच्या पश्यात पत्नी ,आणि आठ वर्षाची मुलगी आहे.पोलिस निरीक्षक संतोष घोळवे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post