सहा आरोपी अटक , ४० हजारांचा अवैध मुद्देमाल जप्त
प्रेस मीडिया लाईव्ह :
राहुल सोनोने (मळसुर) : प्रतिनिधी
चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे होत असल्याच्या वारंवार राजकीय तक्रारी होत होत्या, परंतु चान्नी पोलीस स्टेशन मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ठाणेदार योगेश वाघमारे यांनी बाळापुर उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी बोलावून ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, जाधव सोनोने, हर्षल, आदींनी सापळा रचून सोमवार दि.८ मे रोजीच्या सायंकाळी सस्ती व नवेगाव या दोन गावात चार ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जणांना अटक करून त्यांच्या जवळून रोखसह जुगार साहित्य असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सस्ती येथील आरोपी बाळू दत्तूजी हिराळकर, उमेश रामभाऊ ,अंभोरे, मिलिंद गुलाब अंभोरे, व नवेगाव येथील सतीश भीमराव सरकटे, भगवान दिगंबर गाढवे, प्रशांत अशुजी पायघन, असे सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.