प्रेस मीडिया लाईव्ह :
बाळापूर : प्रतिनिधी :
बाळापुर येथील मोजे पारस येथे पंतप्रधान मच्छदा भव्य मार्गदर्शन शिबिर दिनांक 8 मे 2023 सकाळी 11 वाजता सावता माळी सभागृह पारस तालुका बाळापूर येथे श्री आराध्य दैवत मच्छिंद्रनाथाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी आयोजन समिती श्री गणेश नथुजी सुरजुसे श्रावणजी धारपवार गणेश जी श्रीनाथ अकोला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव वानखडे व कार्यक्रमाचे उद्घाटक बळीरामजी सिरस्कार माजी आमदार बाळापूर तथा भाजपा ओबीसी नेते तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक विनोद राठोड प्रभारी उप आयुक्त मच्छी विभाग अकोला हे असून प्रमुख उपस्थिती श्री पुंजाजी अमरावते उखंडराव सोनवणे राजारामजी म्हात्रे भानूदाजी वाघमारे विजुभाऊ साटोटे संगीताताई इंगळे बाळू नेमाडे हिंगोली बाळासाहेब भारसाकडे सुरजुसे गुरुजी अकोला निलेश राव साटोटे कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सुरजुसे यांनी केले .
प्रास्ताविक मध्ये मच्छीमारांच्या आधीच्या काळामध्ये आधुनिक पद्धत नसताना कोणतेही मोठे मोठे तलाव धरण जलाशय आहे नसून पारंपारिक पद्धतीने नदीवर मासेमारी करून भोई समाजातील मच्छीमार आपला उदरनिराळा करायचे व त्यामधून त्यावेळेस आपल्या मुलांचे शिक्षण वगैरे करून त्यातून छोटे छोटे धंदे उभे केले मात्र आज रोजी सर्वीकडे नदी नाले यावर ते तलाव जलशय झाले असून सुद्धा मच्छीमारांची दैनावस्था आहे त्याला कारण त्यांना तलाव धरण यावर मासेमारी करणे करिता शासनाकडून मिळत असलेल्या अनुदानित योजना व मासेमारी परवाने यासाठी शासन दरबारी भांडा लागत आहे करिता शासनाने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना अंतर्गत सामान्य मच्छीमारांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता आपल्या प्रास्ताविक मध्ये बोलताना सांगितले मच्छी विभागाचे सहायक उपायुक्त प्र विनोद राठोड यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रधानमंत्री मच्छसंपदा योजनेच्या अंतर्गत संपूर्ण माहिती सांगितली व सर्वसामान्य मच्छीमारांना तो तलावर मासेमारी करत असेल अथवा नाल्यावर नदीवर माशाबाई करणाऱ्या भोई समाजाच्या मासेमारांना मस्त संपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलताना सांगितले तसेच कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले बळीरामजी सिरस्कार माजी आमदार तथा ओबीसी नेते यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना मच्छीमारांच्या समस्या शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले यावेळेस मच्छिमार भोई समाज बांधवांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला अकोला जिल्ह्यातील बाळापुर व पातुर येथील मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते