आता पुन्हा मोबाईल सापडला
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -काही दिवसापूर्वीच गांजा मोबाईल कंळबा जेल मध्ये मिळून आला होता.हे प्रकरण ताजे असतानाच परत आणखी एक मोबाईल,मिळाला.दरम्यांन परत एकदा झाडा झडती घेतली.साहीत्य तपासत असताना एका कोठडीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ड्रेनेज मध्ये मोबाईल दिसून आला.याची तुरुंगाधिकारी यांनी अद्न्यात व्यक्ती वर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा मोबाईल कुणी आणला .कोण याचा उपयोग कोणा बरोबर करीत होते .याची माहिती काढ़ने पोलिसांच्या समोर आव्हान आहे.या कंळबा जेलच्यां भिंती कमीतकमी वीस ते पंचवीस फुट उंचीवर असताना तसेच चारी बाजूला असलेल्या मनोरया वरुन खडा पहारा असताना आत गांजा सह इतर वस्तू सापडतात कशा हे न उलगडलेले कोडे आहे.अशा वेळो वेळी घडणारया प्रकारामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढ़ली आहे.