नक्की विकास करायचा आहे की पुणे शहर भकास - अनंत घरत


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : RFD नदी प्रोजेक्ट च्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल चालू आहे , वेताळ टेकडी फोडायला प्रशासन गुलाल घेऊन काम करत असल्याचे दिसत आहे  नक्की ह्यांना करायचे काय ? 


वातावरणीय बदल , अवकाळी पाऊस , पूर, यासारख्या घटना समोर असताना पण अजून प्रशासनाला जाग कशी येत नाही ? नक्की कोणाच्या फायद्यासाठी हा प्रोजेक्ट पुणेकरांवर लादला जातोय ? म्हणूनच 31 मार्च 2023 रोजी पुणे मनपा च्या वतीने देण्यात आलेला पर्यावरण दूत हा पुरस्कार आम्ही आज पुणे मनपात पत्रकार परिषद घेऊन आयुक्त कार्यालयात जमा केला .

पर्यावरण वाचविणे प्रत्येक नागरिकांची प्रथम जबाबदारी आहे त्यासाठी आपण पुढे आले पाहिजे . 29 एप्रिल ला चिपको आंदोलनात सहभाग नोंदवूया पर्यावरण वाचवूयात .

 

अनंत रामचंद्र घरत

पर्यावरण रक्षक

Post a Comment

Previous Post Next Post