विवीध संघटना कडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता विवीध पक्ष ,संघटना ,कार्यकर्ते ,नागरिक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कालकथीत माजी खासदार एस.के .डिगे मेमोरियल फौन्डेशण तर्फे महात्मा फुले यांनी पहिल्यांदा शाळा सुरु केल्याची प्रतिकृती तयार केली होती.तसेच सामाजिक न्याय विभागातर्फे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.भीम कार्यकर्ते यांनी मोटार सायकल रयाली काढ़ली होती. सिध्दार्थ नगर येथे ही लायटिंगची रोषणाई करून योध्दा बॉइज च्या वतीने स्नेहभोजन आयोजित केले होते.तसेच महीला बचत गटाच्या वतीने विविद स्पर्धा घेण्यात आल्या.