प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर ता. १३ मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती ज्येष्ठ कवी कालवश सुरेश भट यांचा ९१ वा जन्मदिन आणि गझलसाद या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन याचे औचित्य साधून गझलसादच्या वतीने"कवी संमेलन व मुशायरा"आयोजित केला आहे.
याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ.दिलीप कुलकर्णी असून यात श्रीराम पचिंद्रे,डॉ दयानंद काळे,शेरखान तांबट,प्रसाद कुलकर्णी हेमंत डांगे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, सारिका पाटील,अनंत चौगले,डॉ. संजीवनी तोफखाने,प्रविण पुजारी,अरुण सुनगार, नरहर कुलकर्णी , वैभव चौगुले,सीमा पाटील,मनिषा रायजादे आदी कवी- गझलकार आपल्या रचना सादर करणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार ता.१५ एप्रिल २०२३ सायं.४.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक,दसरा चौक,कोल्हापूर येथे होणार आहे.तरी रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन गझलसाद समूहाचे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांनी केले आहे.