पुण्यात रविवार दि. ९ एप्रिल रोजी विंटेज अँड क्लासिक कार्स, मोटारसायकल व स्कूटर रॅलीचे भव्यतेने आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यात रविवार दि. ९ एप्रिल रोजी विंटेज अँड क्लासिक कार्स, मोटारसायकल व स्कूटर रॅलीचे भव्यतेने  आयोजन करण्यात आले आहे. रेस कोर्स येथील टर्फ क्लब येथून सकाळी ९.०० वाजता या रॅलीचा प्रारंभ होईल आणि १५ किमीची ही रॅली गोळीबार मैदान – सारसबाग – दांडेकर पुल - लाल बहादूर शास्त्री मार्ग – गरवारे पूल – कृषी महाविद्यालय उड्डाणपूल – जुना बाजार रोड – जिल्हा परिषद – हॉलीवूड गुरुद्वारा रोड - परत येऊन टर्फ क्लब येथे संपेल. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व माजी पोलीस आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लबचे चेअरमन नितीन डोसा (मुंबई), सुभाष.बी.सनस विंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस, वि.सी.सी.आयचे पदाधिकारी व विंटेज कार्सचे मालक उपस्थित राहतील. पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या रॅलीमधील सर्वोत्कृष्ट व्हिंटेज कारला विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.  

पुण्यातील या रॅलीत 125 प्रवेशिका आल्या आहेत ज्यामध्ये अतिशय मौल्यवान जुन्या 70 ते 80 विंटेज व क्लासिक कार्स आणि सुमारे 30 ते 40 विंटेज स्कूटर्स व मोटारसायकलस असतील. या रॅलीमध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार्सच्या व्हिंटेज आणि क्लासिक गाड्या तसेच सुभाष सणस यांच्या मालकीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला,  हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझ, अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज, विनोद खन्ना यांची 2 डोअर सिल्व्हर कलर मर्सिडीज व इतर सेलिब्रिटीज यांच्या विंटेज कार्स तसेच ‘बॉबी’ फेम राजदूत मोटारसायकल अशा अनेक वाहनांचा समावेश आहे. रॅलीदरम्यान ऑस्टिन 7 ही भारतातील सर्वात जुनी रॅली चालक पुण्यातील डॉ. प्रभा नेने चालवणार आहेत.  रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, ऑस्टिन, फोर्ड व इतर फॉरेन कार्स यांचा यात समावेश आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post