दत्तवाड येथील पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


प्रेस मीडिया लाईव्ह :

आधुनिक भारताचे निर्माते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आज पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या घरी साजरी करण्यात आली.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, सरपंच चंद्रकांत कांबळे, युवराज घोरपडे, राजगोंडा पाटील- गुमटे यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले.

 १४ एप्रिल हा दिवस सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. दत्तवाड ग्रामपंचायत, बौद्ध विहार. आदी ठिकाणी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी पोलीस पाटील संजय पाटील, ग्रा.पं. सदस्य रफिक मुल्ला, संजय पाटील, प्रमोद पाटील, तेजस वराळे, मोहन माळगे, प्रशांत कांबळे, विद्याधर कांबळे, सर्जेराव सोळशे, रवींद्र कांबळे, नितीन कांबळे, केशव कांबळे, आकाश शिंगे, अली नदाफ, अजित कांबळे, राजू कांबळे, बाळासो धुपदाळे, अजित कांबळे, सुनील कांबळे, चंद्रकांत लोहार, रामचंद्र कांबळे त्याचबरोबर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post