आमदार प्रकाश आंबिटकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी द्यावी : जनतेची मागणी

प्रेस मीडिया लाईव्ह :

दिलीप कोळी :

 शिरढोण : आमदार प्रकाश आंबिटकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी द्यावी अशी मागणी गारगोटी भुदरगड राधानगरी भागातील नेते कार्यकर्ते महिला सुवासिनी भगिनी यांनी केली आहे. 


आमदार प्रकाश आंबिटकर यांनी २० टक्के राजकारण 80% समाजकारण करून मतदारांशी आगळीवेगळी नाळ जोडून मतदार हेच माझे दैवत समजून त्यांची सेवा करीत राहिले म्हणून दोन वेळा विधानसभेवर घवघवीत यश मिळवून तिसऱ्यांदा निवडून गेले. विकास कामाचा डोंगर उभा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून राधानगरी मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40कोटी निधी मंजूर केले. त्यातील प्रत्येक गावासाठी निधी देण्यात येणार आहे. मतदारांच्या समस्या मार्गे लावल्यामुळे मतदारांच्या हृदयात घर करून राहिलेले तडफदार रणझुंजार आमदार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेतही या विभागाचे प्रतिनिधित्व केले होते.

 जनमानसातही त्यांच्याबद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला आहे. या विभागाच्या डोंगराळ भागाचा विकास अधिक करण्यासाठी त्यांनी मोठ्या राजकीय परिस्थितीत घेतलेला धाडसी निर्णयाबद्दल त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी कॅबिनेट मंत्री पद बहाल केले तर  मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. त्यांनाही ऊर्जा स्फूर्ती प्रेरणा मिळेल. अति उत्साहाने कामे करतील असे मतदारसंघातील नागरिकांना वाटत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post