प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी म्हात्रे हॉस्पिटल समोरील आणि व्ही. के. हायस्कूल पाठीमागील रस्त्याची पाहणी केली. हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे.
म्हात्रे हॉस्पिटल समोरील आणि व्ही. के. हायस्कूल पाठीमागील रस्ता गेले कित्येक महिने कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पूर्ण केला नव्हता. त्या विरोधात सातत्याने कामाच्या ठिकाणी लक्ष देऊन सदर कंत्राटदारावर पनवेल महानगरपालिकेला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्याची पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी मागणी केली आहे. राहिलेले काम वार्षिक कामांमधून योग्य त्या पद्धतीने पनवेल महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून सुरू केले आहे. सुरू केलेल्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर आणि प्रीती जॉर्ज आणि स्थानिक रहिवाशांच्या सोबत केली. गटारांच्या बाबतीत राहिलेले काम त्यावर झाकण बसवणे आणि इतर कामे सुद्धा पुढील काही दिवसात पूर्ण केले जाणार आहे.