पोलिसांत तक्रार दाखल, कंत्राटदार सफाई कामगारांना आळा घालणार का ?
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
नवीन पनवेल पिल्लई कॉलेज जवळील सेक्टर १६ च्या गार्डनमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांना तिथे असलेल्या सफाई कामगाराने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. गार्डनमध्ये खेळायला येणाऱ्या मुलांना तिथे काम करत असणाऱ्या दीपक वसंत बावकर या सफाई कामगाराने गार्डनमध्ये का आलात ? इथे खेळायला यायचे नाही असे दमदाटी करून त्यांना हातचापटीने मारहाण केली .
याबाबत मुलाच्या आईने तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन दिपक बावकर यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३ नुसार तक्रार दाखल केली. मात्र पनवेल महापालिकेमध्ये व सिडको सफाई कामगार यांचे कंत्राटदेउं गुंडप्रवृत्तीची लोक काम करण्यासाठी भरली असून प्रत्येक कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन झालेले आहे का नाही हे तपासण्याची गरज आहे. तसेच ट्रॉबे कोळीवाडा सायन येथे राहणाऱ्याला पनवेल महापालिकेत अथवा सिडको ह्या ठिकाणी नोकरी कशी काय दिली जाते व पनवेलमधील स्थानिक बेरोजगार तरुणांना मात्र नोकरीवर ठेवण्यासाठी कंत्राटदार टाळाटाळ करतात त्यामुळे नक्की यामध्ये काय गौडबंगाल आहे असा सवाल उपस्थित होत आहे.