अवैध धंद्यांना नेरळ मध्ये ऊत, मटका गल्ली पुन्हा

 पोलीस तक्रारदारची वाट पाहात आहेत


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील 

    नेरळ मध्ये सध्या अवैध धंद्यांना ऊत आला असल्याचे चित्र आहे. नेरळमधील जुनी मटका गल्ली अनधिकृत अवैध धंद्यांनी पुन्हा बरबटल्याने बदनाम झाली आहे. तेव्हा या अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी होत आहे. 

            नेरळमधील रेल्वे स्टेशनच्या बाजूला आजाद बेकरीकडे जाणाऱ्या वाटेला मटका गल्ली असे नाव पडले होते. कारण येथे पूर्वी मटका जुगार असे अवैध धंदे चालत असे. हा भाग प्रगत नसल्याने येथून रहदारी देखील  नसायची. तर मागील अनेक वर्षे नेरळ हे अवैध धंद्यांपासून मुक्त होते. मात्र आता या भागात पुन्हा मटका जुगाराचे धंदे सुरु झाले असल्याचे चित्र आहे. 


याठिकाणी दोन दोन मटका, जुगार असे नानाविध अवैध धंदे राजरोसपणे बिनदिक्कत सुरू आहेत. अशात येथील रस्त्यावरून महिला मुली जात असल्याने त्यांना याचा जास्त त्रास होत आहे. येथून जाताना जुगारावर आलेल्या मद्यपी, गर्दुल्ले यांच्या वाईट नजरांना त्यांना झेलत पुढे जावे लागत आहे. तर रहिवासी भागात हे चित्र असल्याने आता रहिवासी देखील यावर आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. मात्र महाराष्ट्रात जुगार बंदी असताना नेरळमध्ये एकापेक्षा जास्त सुरु असलेल्या अवैध धंद्यांना पाठबळ कुणाचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या धंद्यांमुळे मागील पिढ्या बरबाद होऊन किती संसार उध्वस्त झाले असे चित्र असताना आगामी पिढ्या यात ओढल्या जाऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाने यावर कारवाईचा बडगा उगारला अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तेव्हा नेरळ पोलिस यावर कारवाई करणार का ? हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post