पुण्यातून एकाला अटक; नेमकं काय घडलं होतं...?
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
त्या' व्हायरल पत्र प्रकरणी रायगड पोलिसांची कारवाई, पुण्यातून एकाला अटक; नेमकं काय घडलं होतं..? त्या नंतर रायगड पोलिसांनी याबाबत दखल घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रायगड पोलिसांनी पुण्यात येऊन कारवाई केली आहे. हे पत्र बनवून शेयर करणाऱ्या शुभम काळे या तरुणाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
संशयित आरोपी असलेल्या शुभम काळे याला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये रायगड पोलिसांनी त्याला आज अलिबाग न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
खरंतर संपूर्ण राज्यात हे बनावट पत्र व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. त्यानंतर सोशल मिडियावर खरे पत्र देखील व्हायरल करण्यात आले. दोन्ही फोटो सोबत जोडून खरे आणि खोटे पत्र शेयर केले जात होते. त्याच दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान शुभम काळे हा कोणत्या पक्षाचा आहे का? त्याची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? अशा विविध अनुषंगाने पोलिस अधिकचा तपास करीत आहे. त्यामुळे रायगड पोलिसांच्या तपासात आणखी कुणाला अटक होते का? कारवाई काही राजकीय कनेक्शन समोर येते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.