"श्रेया स्पोर्ट्स कोपर कै.नितीन नाईक स्मृती यांचे उत्कृष्ट आयोजन"
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : आयपीएल टी-२० च्या काळात क्रिकेटला विशेष महत्त्व आले आहे. बरेच तरुण क्रिकेटमध्ये आपले भविष्य घडवत आहेत. रायगड मध्ये विशेष करून पनवेल मध्ये क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात भरविले जातात. तरुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पनवेल मध्ये क्रिकेट स्पर्धांना मा.विरोधी पक्षनेते आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम म्हात्रे वेळोवेळी सहकार्य करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून श्रेया स्पोर्ट्स कोपर कै.नितीन नाईक स्मृती आयोजित J.M.M पनवेल प्रिमियर लिग चे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल येथे दि.१९ मार्च२०२३ ते १ एप्रिल २०२३ दरम्यान करण्यात आले होते.
१९ मार्च रोजी या लिग चे श्रीफळ वाढवून उद्घाटन मा.विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. वेगवेगळ्या दहा संघांनी या लीगमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना श्री समर्थ करंजाडे व नितीन स्मृती श्रेया स्पोर्टस कोपर या दोन्ही संघांमध्ये रंगला. यात श्री समर्थ करंजाडे संघाने प्रथम क्रमांक 2,00,000 पारितोषिक आणि चषक पटकावले. या सामन्यांच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.चेतन (भायादादा) म्हात्रे (डायरेक्टर JMMIPL) , श्री. विपुल म्हात्रे (डायरेक्टर JMM होम्स) यांच्या हस्ते विजयी संघाचे सत्कार करण्यात आले.बक्षीस समारंभाच्या वेळी श्री.गणेश कड़ू मा.नगरसेवक , श्री.राजेश हातमोडे मा.नगरसेवक, डॉ.संतोष जाधव, श्री.नंदराजशेठ मूंगाजी (अध्यक्ष पनवेल तालुका काँग्रेस कमिटी) ,मंगेश शेलार (सरपंच, करंजाडे ) श्री.सतीश शेठ म्हात्रे (इनामपुरी) उपस्थित होते. सदर सामन्यादरम्यान उद्योजक श्री.मुकुंद म्हात्रे, श्री.किरण खानावकर,संजय पाटील ((boss), ,श्री.पी. डी. भोईर, श्री.मयूर भोईर, श्री.दयाल पवार ,शशिकांत भोईर (सरपंच चिंचपाडा )संतोष दमडे, (कोपर)राकेश गायकवाड,संतोष पाटील,सचिन घरत,अजयशेठ पाटील,अनुज जितेकर, गजानन पाटील, समीर म्हात्रे, मिथुन पाटील, दत्ता मुंगाजी, रतन खरोल, अविनाश नाईक, जिगर करावकर, आदित्य प्रिया, दिनेश गायकवाड, दिनेश शेलार, श्री.हेमंत दरे आणि क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.