प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
जागतिक दर्जाचे प्रदूषणमुक्त आणि वाहनमुक्त अशी बिरुदावली असलेले पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान.येथे वाहन उभे करण्यासाठी माथेरान प्रवेशद्वारात एक स्वतंत्र व्यवस्था वन विभागाकडून करण्यात आली आहे पण इथे स्थानिकांव्यतिरिक्त पर्यटकांची वाहनेही उभी राहतात.पण पर्यटक वाहन संख्या पाहता वाहनतळ अपुरे पडत आहे त्यामुळे या वाहनतळाला लागूनच असलेल्या महसूल विभागाचा एमपी 93 हा प्लॉट नगरपालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी प्रेरणा सावंत या सतत आग्रही राहिल्या आहेत. याबाबत त्यांनी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मा मुख्यमंत्री यांचेकडे शिफारस करणेकामी पाठपुरावा करीत आहे.
मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटनस्थळ हे माथेरान असल्याने लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात.इतर पर्यटनस्थळापेक्षा वेगळेपण जपलेल असं पर्यटनस्थळ.माथेरान मध्ये वाहनांना बंदी असल्याने येथे वन विभागाच्या वन व्यवस्थापन समितीची स्वतंत्रअशी पार्किंग व्यवस्था आहे 2013 साली तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी पार्किंगसाठी एमएमआरडीए मार्फत निधी मंजूर करून आणला होता.त्याचे काम 2019 मध्ये प्रेरणा सावंत नगराध्यक्ष असताना विविध जाचक परवानग्या प्राप्त करून प्रत्यक्षात उतरवले. आणि पार्किंगचे ब्लॉक चे काम झाले . पण गाड्या उभ्या करण्याची जागा अपुरी पडू लागली यात स्थानिकांच्या सुद्धा गाडया मोठ्या प्रमाणावर उभ्या असतात.पर्यटक आणि स्थानिक यांच्या वाहने उभी करण्याचे एकमेव वाहनतळ असून वाहने उभी करण्यास जागा अपुरी पडत आहे.परिणामी पर्यटकांना घाटात गाड्या उभ्या कराव्या लागतात.त्यामुळे घाट रस्त्यात अनेकवेळा ट्राफिक होऊन पर्यटकांना रस्त्यात तासन्तास ताटकळत राहावे लागले आहे.तर काही पर्यटकांना जागा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी माथेरान शहरातुन काढता पाय घ्यावा लावला याचा परिणाम माथेरानच्या पर्यटनावर झाला.त्यामुळे पर्यटकांना त्रास न होता त्यांचे पर्यटन आनंदात जाऊन ते संतोषाने परतीने जावे या हेतूने पार्किंग साठी महसूल विभागाचा एमपी 93 भूखंड नगरपालिकेकडे हस्तांतर होण्यासाठी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत याबाबत दिनांक 7 डिसेंबर 22 रोजी एका पत्राद्वारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मा मुख्यमंत्री यांचेकामी शिफारस करनेकामी मागणी केली आहे.
याबाबतीत नगरपालिका मार्फत २००८-९ पासून प्रयत्न सुरू होते, गेले पाच वर्षे सतत पाठपुरावा करून शासनाच्या विविध विभागांच्या जाचक अटी आणि शर्ती तसेच विविध कागदपत्र, दस्त आणि माहिती यांची पूर्तता करून अखेरीस ०२ मार्च २०२२ रोजी मा जिल्हाधिकारी रायगड यांनी मा कोकण आयुक्त यांचे मार्फत सदर एम पी ९३ हा भूखंड माथेरान नगरपरिषद यांस हस्तांतरण करणे कामी चा अंतिम अहवाल मा अपर सचिव , महसूल व वनविभाग यांस सादर केला आहे.
सदरची मागणी रास्त असल्याने खासदार बारणे यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे.खासदार बारणे यांनी 12 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन हा भूखंड लवकरात लवकर नगरपालिकेकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे.त्यामुळे मा खासदार यांच्या प्रयत्नाने लवकरच हा भूखंड पालिकेकडे हस्तांतरित होणेकामी चे आदेश होतील असा विश्वास माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केली