कोरोना पुन्हा डोके वर काढतोय... काळजी घ्या , कर्जत मध्ये डॉक्टर बाधित


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

  कर्जत तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट बनला होता.या ठिकाणी आता पुन्हा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. सध्या कर्जत तालुक्यात चार कोरोना बाधित रुग्ण असून त्यात कर्जत शहरातील एक खासगी डॉक्टर  बाधित झाला आहे.


कोरोनाचे दुसऱ्या लाटेमध्ये मोठया प्रमाणावर बाधित रुग्ण कर्जत तालुक्यात समोर येत होते.त्यावेळी कोरोना मुळे मृत्यू झालेल्या बधितांची संख्या देखील मोठी होती.मागील काही दिवसांपासून कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे.आज कर्जत तालुक्यात चार रुग्ण कोरोना बाधित असून कोरोनाने पुन्हा डोके वर  काढल्याने आरोग्य विभागाकडून पुन्हा खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.कर्जत तालुक्यात आतापर्यंत 7284 रूग्णांना कोविड 19 झाला होता.त्यातील 6969 रुग्ण यांनी कोरोना वर मात केली होती आणि तब्बल 311 रुग्णांचे बळी कोरोनाने घेतले आहेत.त्यामुळे कर्जत तालुक्यातील हा मृत्यूचा आलेख जिल्ह्यातील अन्य तालुक्या पेक्षा अधिक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

    तालुक्यात सध्या चार ॲक्टिव रुग्ण असून त्यात कर्जत शहरात एक रुग्ण असून ते व्यवसायाने डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे.आगामी काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post