प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : काल कोथरूड मध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ व भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत झालेले तडीपार गुंडांच्या कुटुंबीयांचे पक्षप्रवेश हे भाजपच्या कार्य संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शवतात. चंद्रकांत पाटील व मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात कोथरूडचा बिहार बनवला जात आहे.
"चाल, चरित्र, चेहरा" अशी घोषणा देणारी व एकेकाळी स्वतःला "पार्टी विथ डिफरन्स" म्हणणारी भारतीय जनता पार्टी आता गुंड, भ्रष्टाचारी व लुटारू लोकांची पार्टी बनली आहे. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी कोणताही विधी निषेध न बाळगण्याचे ठरवले आहे. भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर गुंड, भ्रष्टाचारी, लुटारू लोकांना आपल्या पक्षांमध्ये सहभागी करून घेत आहे. केंद्र, राज्य व महानगरपालिकेमध्ये सर्वत्र सत्ता येऊन देखील भाजपला त्यांच्या राजकारणासाठी गुंडांचा आधार घ्यावा लागतो यातूनच भाजपचं अपयश स्पष्टपणे उघड होतं. जर भारतीय जनता पक्षाने जनतेच्या विकासाची कामे प्रामाणिकपणे केली असती तर त्यांना अशा गोष्टी करायची गरज भासली नसती.
पुणे शहरामध्ये गेली अनेक महिने कोयता गॅंगने उच्छाद मांडलेला असताना आणि नागरिक भयभीत झालेले असताना त्यांना सुरक्षित वाटेल अशी दिलासादायक कृती करण्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मात्र तडीपार गुंडांच्या कुटुंबीयांना त्यांच्या पक्षामध्ये घेत आहेत. चंद्रकांत पाटील हे सामान्य जनतेचे पालकमंत्री आहेत की गुंडांचे पालकमंत्री आहेत असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये तयार झाला आहे.
आपण जी माहिती देता त्या व्यक्तीबद्दल पूर्णतः माहिती मिळवून मग ती बातमी द्यावी पूर्वी तो माणूस कोण होता आणि आता त्या माणसाचं कार्य काय आहे याची पूर्ण माहिती घेणं आवश्यक होतं स्वाती वहिनी मोहोळ या समाजकार्यात लोकांसाठी नेहमी कार्यरत असतात आणि माननीय आमदार श्री चंद्रकांत दादांनी गेली वर्षभर त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा प्रवेश दिला आहे
ReplyDeleteIf a person becomes a gangster by killing a terrorist, then our country needs this type of gangsters.
ReplyDelete