तेजस गुजराथी यांची निवडणुक आयोगाच्या (स्वीप) महाराष्ट्र राज्य सल्लागारपदी निवड!

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  प्रतिनीधी : 

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तेजस गुजराथी यांना नुकतेच भारतीय निवडणूक आयोग च्या अखत्यारीत असलेल्या "स्वीप" म्हणजेच निवडणुक साक्षरता, मतदार जनजागृती याविषयी अनेक उपक्रम राबविले जातात.याच्या निमंत्रित सल्लागारपदी तेजस गुजराथी यांना मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र ) श्रीकांत देशपांडे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

तेजस गुजराथी हे गेल्या वीस वर्षांपासून वृत्तपत्र व प्रसारमध्यमंसोबत काम करीत असून लोकमत, सकाळ अशा विवीध माध्यमांद्वारे राज्य भर अनेक उपक्रम राबविले आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे निवडणुका व प्रती मंत्रिमंडळ स्थापना हे त्यांचे उपक्रम लोकप्रिय झाले.सध्या गुजराथी वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे सी ई ओ , म्हणून कार्यरत असून वी कनेक्ट मासिक, मराठी दुनियादारी न्युज चॅनेल, जगमंगल सोशल फाउंडेशन, मानवसेवा ट्रस्ट, स्व्यंतेज आकडमी. इत्यादी संस्थांवर संचालक म्हणून कार्यरत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post