प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आर्मी लॉ कॉलेज, पुणे च्या वतीने आयोजित क्वेस्ट इंडिका द्वितीय राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सत्कार भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. हा सत्कार कार्यक्रम भारती विद्यापीठच्या एरंडवण कॅम्पस मध्ये झाला.या विद्यार्थ्यांना ऍड. दुष्यंत दवे एक्सलन्स अवॉर्ड , रोख पारितोषिक ,सन्मानचिन्ह मिळाले.त्यामध्ये मानसी श्रीवास्तव ,चहक शर्मा, आयुषी त्यागी यांचा समावेश होता .प्रणव त्रिखा, आशी जैन, सहाय्यक प्राध्यापक जेफी जेकब यांनी मार्गदर्शन केले.