_महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर आज राज्यपालांना दिले निवेदन ; विधीमंडळ कामकाजाचा अहवाल केला सादर_
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, ता. ४ : राज्यात येणाऱ्या विदेशी महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारने मिळून काही मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार केल्या आहेत का, आणि त्याचे पालन योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाची चर्चा करताना झालेले विविध विषय आणि अनेक पातळ्यांवर मिळालेल्या चांगले सहकार्य मिळाल्याचे नमूद केले. विशेषत: राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाबाबत अधिक काम करण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी आज राजभवन येथे बोलताना व्यक्त केली.
यावर राज्यपालांनी ' *महाराष्ट्रात ठिकठिकाणी राज्याच्या हिताच्या अनेक विषयांना चालना देण्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करणार आहे,' असे आश्वासन दिल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सांगितले.
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. रमेश बैस यांची आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज राजभवनात सदिच्छा भेट घेतली.
आज त्यांनी राज्यपालांना विविध विषयांबाबत निवेदन दिले. या चर्चेत डॉ. गोऱ्हे यांनी राज्यातील विविध प्रश्नाकडे राज्यपाल महोदयांचे लक्ष वेधले.
सर्व पातळ्यांवर कामकाजात मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
- यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी राज्यपाल महोदयांना विधान परिषदेच्या विविध कामांची माहिती दिली.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत मंजूर झालेली विविध विधेयके, कामकाज याची माहिती यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
- महिला सुरक्षेच्या प्रश्नावर प्रलंबित असलेले बहुचर्चित 'शक्ती विधेयक' लवकरच मंजूर होणार असल्याचे विधिमंडळ कामकाजात राज्य सरकारने सांगितल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्या विषयात राज्यपालांकडूनही सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
- आजवर सर्व सदस्यांकडून मिळालेले सहकार्य यापुढेही सातत्याने मिळावें अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यपालांनी यावेळी बोलताना 'राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक भूमिकेतूनच आजवर काम करीत असल्याचे सांगितले. झारखंडमध्ये काम करीत असताना अनेक सामाजिक विषयात सहभागी पद्धतीने लोकसहभाग मिळवूनच काम केले आहे. त्याद्वारे लोकांच्या हिताचे अनेक विषय मार्गी लावले आहेत.' असे सांगितले.
यापूर्वी त्यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून जनतेच्या हितासाठी काम केल्याच्या अनेक आठवणीना उजाळा दिला.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या चर्चेत कामकाजाबाबत केलेल्या सूचनांचे पालन करून कामकाजात योग्य तो अवलंब करण्याबाबतही त्यांना राज्यपालांनी आश्वासित केले.