केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच रद्द केला



प्रेस मीडिया लाईव्ह :

केंद्रीय निवडणूक  आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच  रद्द केला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाची  ही मोठी कारवाई आहे. एखाद्या प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळणं म्हणजे प्रतिष्ठा वाढणं असंच मानलं जातं. निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जाची मान्यता दिली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसची मान्यता रद्द केली आहे. हा निर्णय म्हणजे पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार यांना मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.


नियमांनुसार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी ठरावीक टक्के मते मिळणे आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तितके टक्के मते मिळालेले नाहीत, अशी चर्चा आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवारांची संख्या कमी झाली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला 2019च्या निवडणुकीत कमी जागांवर यश आलं. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, यावर विरोधक आता काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केल्यामुळे याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post