शरद पवारांनी आपल्या पक्षातील बंड करु पाहणाऱ्या नेत्यांना भाकरी फिरवण्याचा तर इशारा दिला नाही ना ..?



प्रेस मीडिया लाईव्ह :

शरद पवारांनी आपल्या पक्षातील बंड करु पाहणाऱ्या नेत्यांना भाकरी फिरवण्याचा तर इशारा दिला नाही ना ? अशी  जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचे महत्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला त्यावेळी त्यांच्यासोबत न जाता शरद पवारांचे विश्वासू म्हणून जे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत राहिले होते त्याच नेत्यांनी आता अजित पवारांना साथ दिल्याचं समोर आलं आहे. परंतु शरद पवार यांनी जे जातील ते त्यांच्या जबाबदारीवर जातील. पक्ष मात्र महाविकास आघाडीत राहिल म्हणत भाकरी फिरवण्याचा इशारा दिल्याचं पाहिला मिळालं आहे. 


सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्या बाबत प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाबत त्यांच्या पक्षातील आमदार ज्याप्रकारे वागले तोच प्रकार उद्या राष्ट्रवादीत पाहिला मिळाला तर राष्ट्रवादीला सहानुभूतीची लाट मिळण्याची शक्यता  नाकारता येत नाही. शिवाय उद्वव ठाकरे यांनी वांद्रे येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या माध्यमातून पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळण्याबाबत केलेले सुतोवाच देखील सुप्रीय सुळेंच्या निमित्ताने सत्यात उतरण्यास मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत बोलताना शरद पवारांचे निकटवर्तीय सांगतात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला निवडणुक लढवली त्या वेळी उमेदवार मिळत नसल्यामुळे भाजी वाल्यापासून पानटपरी वाल्यापर्यंत विधानसभेची तिकिटं दिली आणि त्यांना निवडून देखील आणलं. 

सध्याच्या परिस्थितीत पक्ष फुटला तरी पक्ष पुन्हा नव्याने उभा करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची ताकद केवळ शरद पवार यांच्याकडेच आहे. मात्र दुसरी बाजू ही देखील आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून सुरुवातीला दिसणारे चेहरे मागील ३० वर्षापासून अद्याप ही कायम असल्याचं पाहिला मिळत आहे. किंबहुना शरद पवारांची हेच आर्थिकदृष्ट्या सक्षम चेहरे ताकद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या जरी ही मंडळी बंडाच्या तयारीत असली तरी शरद पवार त्यांना नेमके कसं रोखणार की भाकरी फिरवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post