प्रेस मीडिया लाईव्ह :
राहुल सोनोने : (मळसुर)
मळसुर.पातूर तालुक्याला 7 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याने ,मळसुर ,पाडसिंग, गावंडागाव ,चान्नी, ग्रामीण भागातील घरांची मोठे पडझड होऊन अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडून गेली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.
वादळी वाऱ्यामुळे मोठे वृक्ष उखळून पडलीत. या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे अनेक गुरे ढोरंही मरण पावली आहेत मात्र कोणतीही मनुष्यहानी झाली नाही सायंकाळी चारच्या सुमारास अचानक विजा कडाडून वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पावसात सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असून उन्हाळी पिकांचे जबरदस्त मोठे नुकसान झाले असल्याचे बोलल्या जात आहे तसेच परिसरातील अनेक विद्युत पोल कोसळलेत त्यामुळे पातुर शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.