मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. प्रलंबित असलेले शक्ती विधेयक मंजूर होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; व्यक्त केली अपेक्षा
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, ता. २६ : संभाजीनगर येथे एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एका महिन्यापुर्वीच संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, आरोपींना शिक्षेची भीतीच वाटणे, आता कमी झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूना देखील त्यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये 'सेफ कॅम्पस' योजना राबविण्याबाबत बोलावून सांगितले होते.
आता घडलेल्या या दुर्दैवी घटनेमध्ये या प्राध्यापक महोदयांची पत्नीच त्यांना साथ देत होती हे मात्र अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. त्यामुळे त्यानाही यामध्ये सहआरोपी करणे अत्यावशक आहे. स्त्रियाच जर एकमेकींशी अशा प्रकारे वागायला लागल्या तर मात्र खरोखरीच चिंता वाटावी अशी स्थिती येईल. याच प्रमाणे एका दिराने आपल्या वहिनीवर अत्याचार केल्याची घटना येथे घडली आहे. मोठ्या शहरांमध्ये हल्लीच्या काळात शेजारधर्म, मदतीची भावना कमी होत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती आता फोफावत चालल्या आहेत.
आता या ठिकाणी नवीन पोलीस आयुक्त मनोज लोहिया आलेले आहेत त्यांच्याशी देखील मी बोलणार आहे. पोलिसांना काही यंत्रणा कमी पडत असेल किंवा आणखी काही प्रकारची मदत हवी असेल त्याचाही आढावा पालकमंत्री आणि संबंधितांची घेतला पाहिजे. माझी भूमिका नेहमी त्यांना मदतीची असेल. ते यावर लवकरच योग्य ती कार्यवाही करतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, हे काम करत आहेत. गुन्ह्याच्या तपासाबाबत विचार केला असता दोष सिद्धीचे प्रमाण आपल्याकडे फार कमी आहे. ते वाढण्यासाठी काम होणे आवश्यक आहे. बर्याचशा केसेस या साक्षीपुराव्या अभावी सुटतात, अशी आकडेवारी संभाजीनगरसंदर्भात माझ्याकडे आली होती. राज्यामध्ये साक्षीदार संरक्षण कायदा अजून प्रभावी झाला पाहिजे. यामध्ये मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. प्रलंबित असलेले शक्ती विधेयक मंजूर होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
आपण कोणताही कायदा हातात घेऊ शकतो, अशी भूमिका समाज कंटकांनी घेऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. प्रत्येक भागात शांतता समिती आणि दक्षता समित्या स्थापन केल्या पाहिजेत. अशा प्रकारचे काम करण्यार्या संस्थाना संरक्षण मिळाले पाहिजे. त्यांनाच मारहाण करण्याचे प्रकार होत आहेत, हे बरोबर नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. काही ठराविक संघटना आम्ही पोलिसांना कसे जुमानत नाहीत हे दाखवत असतात. गेले काही दिवस बदल्या झाल्या आहेत. या काळात सुटण्यासाठी काहीतरी प्रयत्न करून तडजोडी करत असतात. वरिष्ठ अधिकारी नसतील तेंव्हा सीसीटीएनएस, सीसीटीव्ही सारख्या यंत्रणा उपयुक्त ठरू शकतील.
संभाजीनगरमध्ये पोलीस कर्मचारी, विशेषत: महिला पोलिसांना काही प्रकारच्या समस्या असतील तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे याबाबत माहिती दिली पाहिजे. याबाबत राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांनी स्वत लक्ष घालून भेट दिली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपापल्या कामावर आणि विभागाच्या कामांवर नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. याबाबत संभाजीनगरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त श्री मनोज लोहिया यांना डॉ. गोऱ्हे यांनी पत्राद्वारे सूचना केल्या आहेत.