गेवराई पंचायत समितीतील घरकुलचा सावळा गोंधळ जिल्ह्यात गाजणार.!

 रयत शेतकरी संघटनेचे सुनिल ठोसर यांचे आगळे वेगळे अंदोलन 

प्रेस मीडिया लाईव्ह :

गेवराई | प्रतिनिधी

गेवराई पंचायत समितीतील घरकुल योजनातील सावळा गोंधळ आता संपूर्ण बीड जिल्ह्यात गाजत आहे.या विभागातील इंजिनिअर सध्या  घरकुल मंजूर ,चेक,हाफ्ता आदि कामे करण्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्थपुर्ण व्यवहार करण्यासाठी स्पर्धा सुरु केली आहे.हा सर्व सावळा गोंधळ तत्काळ बंद करण्यात यावा यासाठी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी पुढाकार घेतला असुन त्यांनी याबाबत गटविकास आधिकारी गेवराई यांना निवेदन दिले आहे.

.दि.२९ एप्रिल शनिवार रोजी गेवराई पंचायत समिती समोर जागरण गोंधळ, हलगी पथक, अरादी मंडळ, बोंब मारत शेतकरीपुञ गणेश फरताडे यांचा शेतक-यांच्या समस्या व राजकीय प्रशासकीय व्यवस्था बाबत कार्यक्रम घेत अमरण उपोषण करणार आसल्याचे सुनिल ठोसर आदी सहकारी यांनी सांगितले असुन या कार्यक्रमा बरोबरच उपोषणस्थळी जागरण गोंधळ,पथनाट्य,नाटक,गित गायन आदि कार्यक्रम घेण्यात येणार आसल्याने गेवराई पंचायत समितीतील घरकुल योजनेतील सावळा गोंधळ आता संपूर्ण बीड जिल्ह्यात चव्हाट्यावर येणार असुन सुनिल ठोसर यांच्या या आगळ्या वेगळ्या अंदोलनाची चर्चा सर्वञ होऊ लागली आहे.

    गेवराई पंचायत समितीत सध्या घरकुल योजनेत होत असलेल्या लाभार्थ्यांकडून अर्थपुर्ण व्यवहार व सावळा गोंधळ येथील इंजिनिअर व आदी अधिकारी तसेच ग्रामपंचायत पातळीवरील अनेक राजकीय हस्तक्षेप यांचे पात्र लाभार्थ्यांना डावलल्यामुळे चांगलेच धाबे दणाणले असून संपूर्ण बीड जिल्ह्यात सध्या गाजत आहे.या सर्व सावळा गोंधळावर लगाम बसण्यासाठी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर आदी सहकारी यांनी पुढाकार घेत गेवराई पं.स.चे गटविकास आधिकारी यांना निवेदन देत दि.२९ एप्रिल रोजी अमरण उपोषण करण्याचा निर्धार घेतला आहे.

गेवराई पंचायत समितीतील घरकुल योजनातील सावळा गोंधळ संपूर्ण बीड जिल्ह्यात चव्हाट्यावर आणण्यासाठी या ठिकाणी अमरण उपोषण करत शेतकरी पुञ यांचे शेतकऱ्यां बाबत होत असलेल्या विवीध योजनेतील लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी आपल्या कागदपत्रांसह समक्ष आंदोलनास हजर राहून वंचित शोषित पीडित यांना लाभ मिळून देत हे अंदोलन छेडण्यात येणार आहे.

या अंदोलनाची आता संपूर्ण गेवराई तालुक्यात चर्चा होऊ लागली आहे.गेवराई तालुक्यातील घरकुलधारक मंजूर झालेल्या घरकुल धारकांकडे अर्थपुर्ण व्यवहार करत अनेक टेबलवर कसे लाभार्थ्यांची पिळवणूक करतात हे या अमरण उपोषण दरम्यान संपूर्ण बीड जिल्ह्य़ात आता दिसणार आहे.दरम्यान गेवराई पंचायत समितीतील अधिकारी जे घरकुल धारकांकांसाठी अर्थपुर्ण व्यवहार,चेक व मंजुर बिलासाठी पिळवणूक करतात याचा सावळा गोंधळा २९ एप्रिल रोजी संपूर्ण बीड जिल्ह्यात चव्हाट्यावर येणार आसल्याचे दिसुन येत आहे.दरम्यान गेवराई पंचायत समितीत घरकुल योजनेत खुलेआम भ्रष्टाचार करणा-या आधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई वरिष्ठांनी करावी अशी देखील मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर आदी सहकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post