प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर :दत्तात्रय अशोक काटे याने नात्या मधील असलेल्या एका सात वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार केला होता त्याला आज जिल्हा सत्रन्यायालयाने आरोपीला सहा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ..या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की ,पिडीत लहान मुलगी ही आपल्या अंगणात खेळत असताना फूस लावून नेले होते. या बाबतचा सूरु असताना तीच्या नातेवाईकांना सांगली जिल्ह्यातील जत येथे असल्याचे समजले.आरोपीसह पिडीत बालीकेला करवीर पोलिस ठाण्यात आणले.आरोपी याने दोन दिवसांच्या कालावधीत फळ मार्केट येथे पिडीत बालीकेवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात त्याच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी 9 साक्षीदार तपासून फिर्यादी आणि पिडीत बालीकासह इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.त्या नुसार न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून सहा वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या कामी तपासअधिकारी भरत पाटील ,सागर पोवार ,माधवी घोडके यांचे सहकार्य लाभले.