दोन आरोपी व दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडुन त्यांचेकडून चोरीच्या व गुन्ह्यातील 11 मोटर सायकल जप्त.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  दोन आरोपी व दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडुन त्यांचे कडून चोरीच्या गुन्ह्यातील 11 मोटर सायकल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी कारवाई केली.

श्री. साहिल रफिक कुरणे, रा. माले मुडशिंगी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांनी आपली टी. व्ही. एस. सुझुकी मोटर सायकल क्रमांक एम. एच. 09/ ए. जे. 781 ही त्यांचा मीत्र नितीन जाधव रा चिंचवाड, ता, करवीर यांचे राहते घराचे समोर उभा करून ठेवली असताना ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत त्यांनी दिले फिर्यादी प्रमाणे गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 81/2023, भा.द.वि.स.क 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.


मा. श्री. शैलेश बलकवडे साो, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध होवून मोटर सायकल चोरीचे घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन कारवाई करणे करीता विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथके तयार करुन पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना घडलेल्या गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्हा केलेची पध्दत व तांत्रिक दृष्ट्या तपास करून तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले होते. आज दिनांक 12.04.2023 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तपा पैकी पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अमंलदार रणजित पाटील, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी व विनोद कांबळे यांचे पथकास त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गांधीनगर पोलीस ठाणे, कडील टी. व्ही. एस. सुझुकी मोटर सायकल चोरीचा गुन्हा हा रवी नामदेव पवार, रा. पारधी वसाहत, शांतीनगर, उचगांव, कोल्हापूर याने व त्याचे साथीदारानी मिळुन केला असुन ते सदर गुन्ह्यातील चोरलेली सुझुकी मॅक्स मोटर सायकल विकणे करीता आज रोजी कंदलगांव ते के.आय.टी. कॉलेजकडे जाणारे रोडवर के. एस. पॉईंट हॉटेल जवळ येणार आहेत. मिळाले माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील वर नमुद तपास पथकाने के. एस. पॉईंट हॉटेलचे समोरील बाजूस सापळा लावून 01) रवि नामदेव पवार, व. व. 21, रा. पारधी वसाहत, शांतीनगर, उचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर 02) सुनिल वसंत वळकुंजे, व.व.19, रा. धनगर गल्ली, उचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचेसह त्यांचे सोबत असलेले दोन विधीसंघर्षग्रस्त बालकाना त्यांचे कब्जातील टी. व्ही. एस. सुझुकी व पॅशन मोटर सायकलसह ताब्यात घेतले, नमुद इसमांचे कब्जात मिळालेले मोटर सायकलबाबत अधिक चौकशी केली असता, कब्जात मिळालेली टी. व्ही. एस. सुझुकी मोटर सायकल ही चोरीची असून त्याबाबत गांधीनगर पोलीस ठाणे, गु.र.नं.81/2023, भा.द.वि.स. क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे निष्पन्न झाले नमुद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्या सर्वांनी मिळुन गेले चार ते पाचम हिन्याचे कालावधीत शहापूर, हुपरी, वडगांव, शिरोली दुमाला, वसगडे, चिंचवाड जि. कोल्हापूर व पट्टणकुडी ता, चिक्कोडी, कर्नाटक या ठिकाणावरुन एकूण 09 मोटर सायकल चोरलेची कबुली दिलेने त्यांचे माहितीने त्यांचे कब्जात मिळालेले मोटर सायकलसह चोरीच्या एकूण 09 मोटर सायकल व गुन्हा करणेकरीता वापरलेल्या 02 मोटर सायकल अशा एकूण 2,25,000/- रुपये किंमतीच्या 11 मोटर सायकल जप्त केल्या आहेत आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकांचे कब्जात गांधीनगर पोलीस ठाणेकडे दाखल असलेल्या गुन्हयातील सुझुकी मोटर सायकल मिळुन आलेने त्यांना पुढील कारवाई करीता गांधीनगर पोलीस ठाणे येथे रिपोर्टाव्दारे हजर केलेले आहेत,

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. निकेश खाटमोडे-पाटील सो व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार रणजित पाटील, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, संजय पडवळ व संतोष पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post