दोघांच्या कडून एक कोटी 80 लाख किमंतीची व्हेल माशाची उलटी जप्त.

           स्थानिक गुन्हे अन्वेषण यंत्रणेची जोरदार  कारवाई.                                


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर-व्हेल माशाची  विक्री साठी घेऊन आलेलया दोघांना दसरा चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण यंत्रणेने सापळा रचून कारवाई केली.माधव विलास सूर्यवंशी (वय 38,रा बेडकीहाळ).आणि अविनाश सुभाष खाबडे (वय 32,रा .लिशा हॉटेल).अशी त्या दोघांची नावे आहेत.त्याच्याकडुन पोलिसांनी एक कोटी 80 लाख रुपये किमंतीचा अंबरग्रीस ,मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

 


या बाबतची सविस्तर माहिती अशी की ,  व्हेल माशाच्या उलटीदृश्य वस्तूची विक्री करण्यासाठी दोघेजणं येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या नुसार सोमवारी दुपारी दसरा चौकात सापळा रचण्यात आला.तेथे संशयीतरित्या वावरणारे माधव सूर्यवंशी आणि अविनाश खाबडे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी योग्य उत्तर दिले नाही. संशयावरुन अधिक   चौकशी केल्यावर त्यानी विक्रीसाठी अंबरग्रीस आणल्याचे स्पष्ट झाले.विक्री आणि तस्करासाठी या वस्तुवर बंदी अस ताना त्यानी तो कोणाकडुन आणला कुणाला विकणार होते याची चौकशी सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी सांगीतले.

या कारवाईत उपनिरीक्षक शेष मोरे ,विनायक सपाटे ,संजय पडवळ आदीनी भाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post