15 मे पर्यंत जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन 2023 प्रकाशनासाठी माहिती 15 मे पर्यंत सादर करावी


प्रेस मीडिया लाईव्ह :

     कोल्हापूर,  (जिमाका) : जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन सन 2023 च्या प्रकाशनासाठी शासनाच्या नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार संबंधित कार्यालयांनी परिपूर्ण माहिती 31 मे 2023 पर्यंत सादर करावयाची आहे. त्यानुसार संबंधित सर्व कार्यालयांनी 15 मे 2023 पर्यंत माहिती उपलब्ध करुन देण्याचे  आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या प्रभारी उपसंचालक सायली देवस्थळी यांनी केले आहे. 

सामाजिक व आर्थिक समालोचन शासकीय आकडेवारीचा एक मुख्य स्त्रोत आहे. यामध्ये विविध कार्यालयांची विकासात्मक आकडेवारी प्रकाशित केली जाते. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचनमध्ये जिल्हा स्तरावरील सामाजिक व आर्थिक निर्देशकांबाबतची तालुकानिहाय माहिती दर्शविण्यात येते. या माहितीचा उपयोग विविध योजनांच्या नियोजनासाठी होतो. तसेच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, संशोधक विद्यार्थी इ. या माहितीचा वापर करतात. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2023 चे प्रकाशन वेळेत प्रकाशित होण्याकरिता संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक दि.26 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उप आयुक्त(नियोजन) श्री.कोलगणे, अर्थ व पुणे सांख्यिकी संचानालनालयातील प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक श्री. माळी यांच्या सहअध्यक्षतेखाली झाली.  या बैठकीस  प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी प्राजक्ता साळुंखे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयाच्या प्रभारी उपसंचालक सायली देवस्थळी व जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

 जिल्हा विकास आराखड्याबाबत श्री. कोलगणे यांनी या विषयाची माहिती दिली.  त्यात प्रामुख्याने जिल्ह्याचा विकास आराखडा माहे एप्रिल 2023 ते जून 2023 अखेर नियोजन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण करावयाचा आहे, असे त्यांनी सूचित केले. या आराखड्यास राज्यस्तरीय कार्यकारी  समितीपुढे  ठेवून नंतर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीमध्ये मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

यावेळी उपस्थित मान्यवरांचे व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार सांख्यिकी कार्यालयाच्या सायली देवस्थळी यांनी मानले.


Post a Comment

Previous Post Next Post