5,08,550 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : माणगांववाडी, ता. हातकणंगले गावचे हद्दीत एकूण 05 ठिकाणी गावठी दारु तयार करणेचे हातभट्टीवर छापा : 5,08,550 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला .
उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हातकणंगले पोलीस ठाणे यांची संयुक्तीक कारवाई.. पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे सो यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत.
मा. वरीष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, जयसिंगपूर विभाग श्री रामेश्वर वैंजणे यांचे अधिपत्याखाली परि. पोलीस उप अधीक्षक श्री. रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे व हातकणंगले पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी महादेव तोंदले, पोलीस उपनिरीक्षक यशवंत उपराटे, वडगांव पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे, जयसिंगपूर उपविभागातील तसेच स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखा कोल्हापूर व पोलीस मुख्यालय कोल्हापूर कडील एकूण 44 पोलीस अमंलदार यांनी अवैध्य धंद्याविरुध्द प्रभावी कारवाई करणेकामी छापा पथक तयार केले. सदर छापा पथकाने दिनांक 30.04.2023 रोजी पहाटे हातकणंगले पोलीस ठाणेचे परीसरात माणगांववाडी, ता. हातकणंगले या गांवचे हद्दीत जावून शहानिशा करून माणगांववाडी गावचे पुर्व बाजूस असले ओढ्यालगत एकूण 05 ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणा-या भट्ट्यावर छापा टाकून गावठी हातभट्टया नष्ट केल्या.
सदर परिसरात 05 ठिकाणी हातभट्टीची दारु तयार करणेकरीता वापरत असणारे 8,520 लिटर कच्चे रसायन, 2,940 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व इतर साहित्य असा एकूण 05,08,550 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला आहे. सदरबाबत इसम नामे
01) संजय नरसू बिराणे, रा. रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
02) सतिश वसंत कांबळे,
03) सुशिल वसंतराव बागडे,
04) भुपाल श्रीपती कांबळे,
05) संजय बाळू कांबळे, अ.नं. 02 ते 05 रा. साजणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या पाच इसमांचे विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. शैलेश बलकवडे यांचे मार्गदर्शना प्रमाणे. उपविभागीय पोलीस अधिकारी सो पूर विभाग श्री. रामेश्वर वैंजणे, परि. पोलीस उप अधीक्षक श्री रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, हातकणंगले पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी महादेव तोंदले, पोलीस उपनिरीक्षक यशवंत उपराटे, वडगांव पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर तसेच जयसिंगपूर उपविभागातील व पोलीस मुख्यालय कोल्हापूर कढील पोलीस अंमलदार यांनी मिळून केली आहे.