प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - राजामपुरी परिसरात रहाणारया तरुणाकडून जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्या कडून अंदाजे दीड लाख रुपये किमंतीचा गांजा साठा हस्तगत करण्यात आला आहे.फुलेवाडी परिसरात गणेशाचार्य या तरुणाला पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याच्याकडील दहा किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे .
ही कारवाई जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदिप जाधव,हवालदार प्रशांत घोलप ,परसुराम गुजरे ,सुशांत पांडव ,गजानन गुरव यांच्या पथकाने केली.संशयीत तरुणाने गांजा कर्नाटकातून आणल्याचा संशय असून या मागे सीमा भागातील एखादी मोठी टोळीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेशाचर्य हा पहील्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे.हा मोलमजुरी करणारा तस्करीत कसा काय आला याचाही पोलिस तपास करीत आहेत.