प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -राज्य शासनाने सर्व पात्र लाभार्था साठी गुढ़ी पाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करणार होते.पण काही तांत्रिक कारणामुळे गुढ़ी पाडव्याला वाटप होऊ शकले नाही.पण आज शासकीय विश्राम ग्रुह येथे काही मोजक्या लाभार्थ्याना पालकमंत्री श्री.दिपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार ,आमदार श्रीमती जयश्री जाधव ,कोल्हापूरच्या आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजयसिंह चव्हाण ,जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर यांनी पुरवठा अधिकारी यांना एकही लाभार्थी वंचीत रहाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. जवळपास निम्म्मा आनंदाचा शिधा उपलब्ध झाला आहेत.उर्वरीत दोन चार दिवसात ऊपलब्ध होणार असल्याचे सांगितले .यामध्ये रवा ,चणाडाळ ,साखर आणि पामतेलाचा समावेश असल्याचे सांगितले.जिल्हा पुरवठा अधिकारी यानी 14 एप्रिल पर्यंत वाटप करणार असल्याचे सांगितले.