उद्या शनिवारी पोस्ट खात्याची ३९९ अपघाती विमा योजनेचे शिबिर
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कोल्हापूरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या भारत सरकारच्या ' आयुष्यमान भारत जन कार्ड नोंदणी उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या योजनेंतर्गत आभा कार्डची नोंदणी झाली असून दिवसभरात पत्रकार आणि त्यांचे कुटुंबिय अशा १४७ जणांची नोंदणी करण्यात आली.येत्या दोन-तीन दिवसांत या कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
दरम्यान उद्या शनिवार,दि.१५ एप्रिल रोजी प्रेस क्लब कार्यालयात पोस्ट विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३९९ या अपघाती विमा योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आले असून,आधारकार्डही अपडेट करण्यात येणार आहे,या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रेस क्लब कडून करण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन,अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसाठी सहकार्य करणाऱे सांगलीचे अब्दुल तासगावकर यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,कार्याध्यक्ष दिलीप भिसे,सचिव बाबासाहेब खाडे,खजानिस पी.ए. पाटील,संचालक समीर मुजावर,सुखदेव गिरी, सचिन सावंत,मिथुन राजाध्यक्ष,बाबुराव रानगे, भूषण पाटील,संग्राम काटकर,ज्ञानेश्वर साळोखे यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व सभासद आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते.
आभाची नोंदणी आयुष्यमान भारत जन आरोग्य मध्ये होईल
महाराष्ट्रसह एकदोन राज्य वगळता उर्वरित राज्यात आभा योजनेंतर्गत नोंद झालेले कार्ड आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत वर्ग करण्यात आली आहेत.महाराष्ट्रातसुद्धा आभा कार्ड आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत नोंद केली जाण्याची शक्यता आहे.त्यासाठीच आभाची नोंदणी होत असल्याचे, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल तासगावकर यांनी सांगितले.
--------------