प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -सध्या भारतभर भाजप कडुन वीर सावरकर गौरव यात्रा काढ़ली जात आहे.तसेच कोल्हापूरपुरात वीर सावरकर गौरव यात्रा मिरकर तिकटी ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर काढ़ण्यात आली.तर दुसरीकडे उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून शिवाजी महाराज चौकात वीर सावरकर यांना भारत रत्नं पुरस्कार दया म्हणुन धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्रात भाजप सरकारचे राज्य असून अजून वीर सावरकर यांना भारतरत्नं पुरस्कार का दिला नाही अशी उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून विचारणा करून जोरदार करून शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला.याचे नेतृत्व उध्दव ठाकरे गटाचे संजय पवार ,विजय देवणे ,रविकिरण इंगवले ,तसेच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यां प्रमाणात उपस्थित होते.भाजपची वीर सावरकर गौरव यात्रा शिवाजी चौकात येताच वीर सावरकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.भाजपचे राहुल चिकोडे ,सत्यजित कदम ,आणि कार्यकर्ते मोठ्यां प्रमाणात उपस्थित होते.कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा दाखल करण्यात आला होता.