छ, राजाराम साखर कारखाना निवडणूकीत महादेवराव महाडिक यांचा दमदार वियज .


प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुरलीधर कांबळे

 कोल्हापुर :   छ, राजाराम साखर कारखाना निवडणूकीत महादेवराव महाडिक यांचा दमदार वियज . या यांच्या विजयानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या विजयानंतर कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती राजाराम कारखाना संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक हे विजयी झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना 129 पैकी 84 मते मिळाली. तर विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. 9 पैकी 6 गटात महाडिक गटाने विजय मिळवला.महाडिकांच्या विजयानंतर गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. निवडणुकीच्या निकालानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजचा विजय सर्व प्रामाणिक सदस्यांचा असल्याची प्रतिक्रिया महादेवराव महाडिकांनी दिली. तर या विजयानं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, जे कारखान्याशी प्रामाणिक राहिले त्यांच्यामुळे आम्ही विजयी झालो. हा विजय सर्व प्रामाणिक सभासदांचा आहे.याचबरोबर विजयाचं श्रेय अमल महाडिक आणि धनंजय महाडिक यांचे देखील आहे. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे. या विजयानं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेलं. ज्यांना शड्डू ठोकता येत नाही ते रिंगणात उतरले. या विजयामध्ये आवाडे, विनय कोरे यांची मदत मोलाची ठरली. कष्टकरी शेतकऱ्यांचा विजय असल्याचे ते म्हणाले.सहकार टिकवण्यासाठी सभासदांनी कौल दिला- धनंजय महाडिक सतेज पाटलांनी खालच्या पातळीवर टीका केली.द्वेष भावनेतून सतेज पाटील यांनी निवडणूक लावली. पण आज निकाल आपण सगळेचजण पाहत आहोत.त्यांनी विकारी प्रचार केला.खालच्या पातळीवर टीका केली. याउलट अमल महाडिक यांनी विकासाच्या पातळीवर प्रचार करत लोकांचा विश्वास संपादन केला.म्हणूच सभासदांनी विकासाला कौल दिला आहे. माजी पालकमंत्री यांनी आणि त्यांच्या भावाने भ्रष्टाचारातून जो पैसा कमावला तो राजारामच्या सभासदांना देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वाभिमानी सभासदांनी पाटलांना झिटकारलं आहे. सहकार टिकवण्यासाठी 28 वर्ष महादेवरव महाडिक झटले आहेत. याला सभासदांनी कौल दिला आहे.या सर्वांचे आभार मानतो.

सतेज पाटील यांच्यावर टीका करताना त म्हणाले की, सत्तेत असताना सतेज पाटलांची भाषा मग्रुर होती.अडीच वर्ष त्य़ांनी अनेकवेळा अस भासवण्याचा प्रयत्न केला की,इथूनपुढं महाडिकांनी कधीच गुलाल लागणार नाही. पण राज्यसभा आणि राजाराम कारखान्याच्या निकालानंतर हे स्षष्ट झालय की इथूनपुढ महाडिक परिवार आणि भाजप कोल्हापुरात गुलालातच राहणार अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post