स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व चंदगड पोलीस ठाणे, कोल्हापूर यांची संयुक्तीक कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे सो यांनी कोल्हापूर जिल्हयातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत. वरीष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे परी पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंग, पोलीस उप अधीक्षक श्री. रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व चंदगड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी संतोष घोळवे तसेच एकूण 23 पोलीस अमंलदार यांनी अवैध्य धंद्याविरूध्द प्रभावी कारवाई करणे कामी छापा पथक तयार केले. सदर छापा पथकाने दिनांक 25.04.2023 रोजी पहाटे चंदगड
पोलीस ठाणेचे परीसरात यर्तनहट्टी, चनेट्टी व डुक्करवाडी ता. चंदगड या गांवचे हद्दीत जावून शहानिशा करून यर्तनहट्टी, चनेट्टी व डुक्करवाडी ता. चंदगड या तीन गांवचे हद्दीतील शेतात व नदीकाठी एकूण 08 ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणा-या भट्ट्यावर छापा टाकून गावठी हातभट्टया नष्ट केल्या. सदर परिसरात 04 ठिकाणी हातभट्टीची दारु तयार करणेकरीता वापरत असणारे 365 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 38,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरबाबत इसम नामे राजाराम परशराम वाघमोडे, व. व. 65, रा. माणगांव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर याचेसह एकूण चार इसमाविरुध्द चंदगड पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे एकूण चार गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्हयांचा अधिक तपास करुन अनोळखी आरोपींची नांवे निष्पन्न करणेची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. शैलेश बलकवडे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंग, परि पोलीस उप अधीक्षक श्री. रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व चंदगड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी संतोष घोळवे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व चंदगड पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार यांनी मिळुन केली आहे.