प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -हातकंणगले तालुक्यातील तारदाळ येथील अल्पवयीन मुलीचा हनीमनाळ (गडहीग्लज) येथील तरुणाचा गेल्या वर्षी विवाह झाला होता.संबंधित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले त्यातुन तिला दिवस गेल्याने तिच्या माहेरच्या लोकांनी गडहीग्ल्ज परिसरातील एका दवाखान्यात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले.डॉक्टरांनी तेथील पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बालविवाह प्रतिबंध आणि पोस्को कायदान्व्ये अल्पवयीन मुलीचा पती रोहित कल्लापा नाईक (वय 22). याच्यासह सासू सासरे,आणि आई वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपासासाठी शहापूर पोलिसांच्याकडे वर्ग केला आहे.