प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छ. शिवाजी महाराज जयंती व रमजान ईद या पार्श्वभूमीवर काल रोजी दुपारी दिलबहार तालीम मंडळ चौक येथे जातीय दंगा काबू योजना राबविण्यात आली.
दिलबहार चौकामध्ये दोन भिन्न समाजाच्या गटांमध्ये मोठा वाद सुरु असल्याची माहिती कळवून अतिरिक्त फोर्स मागविण्यात आला. त्याप्रमाणे श्री. मंगेश चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, श्री. सतीश गुरव पोनि राजवाडा, श्री. श्रीकृष्ण कट्टकधोंड पोनि लक्ष्मीपुरी, श्री. तनपुरे पोनि राजारामपुरी, श्री. कुंभार सपोनि शाहुपूरी, श्री. संदीप जाधव पोउनि राजवाडा, पोउनि नलावडे राजारामपूरी यांचेसह उविपोअ विभाग, शाहुपूरी, राजारामपूरी, लक्ष्मीपूरी, जुना राजवाडा पोलीस ठाणेकडील प्रत्येकी 10+10 अंमलदार व पोलीस मुख्यालय येथील RCP स्ट्रायकिंग असे सर्व अधिकारी व अंमलदार वेळेत हजर झाले. हजर झालेले सर्व अधिकारी/अंमलदार यांना एकत्रित करुन जातीय दंगल काबू योजनेचे महत्व सांगून त्यानंतर शाहू मैदान येथे नेऊन त्याठिकाणी मॉब डिस्पोजलचा सराव घेण्यात आला.