मोठी बातमी : मटकाकिंग टोळीच्या म्होरक्यासह सहा जणावर हद्दपारीचा आदेश काढ़ण्यात आला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कुरुंदवाड -कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मा .श्री.बलकवडे यांनी कुरुंदवाड येथील मटका किंगचा म्होरक्या प्रशांत दिनकर चव्हाण यांच्यासह त्याच्या साथीदारावर सहा महिने कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश काढ़ण्यात आला.

यामध्ये नासीर बागवान ,हमीद आब्बास भाई,गणपती शिंदे,(रा .कुरुंदवाड).तसेच बाळू यंशवंत चव्हाण (शिरढ़ोण). ,दशरथ गोफने (आसरानगर ,इंचलकंरजी).आणि नंदकुमार मोहीतेसह यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी चव्हाण यांच्यासह त्याच्या साथीदारांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.त्या अनुशगाने हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.मटका आणि जूगार प्रकरणातील टोळीला या पोलिस ठाण्यातील ही पहीलीच कारवाआई आहे.

Post a Comment

Previous Post Next Post