कुरिअर सेंटर मधुन चांदीच्या विटा चोरणारयाला अटक

 पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त.        



 प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : क्राईम रिपोर्टर : 

कोल्हापुर -भवानी मंडप परिसरात करवीर नगर वाचनालय   असून त्याच्या शेजारी लक्ष्मी कुरीअर आहे.त्या कूरीअर मधुन काही चांदीच्या विटा चोरीला  गेल्या होत्या या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चोवीस तासांच्या आत संशयीत प्रशांतकुमार श्रीविरेश यादव (रा.उत्तर प्रदेश ,सध्या भाऊसिंग रोड कोल्हापूर).याला अटक करून चोरीला गेलेला 5 लाख 47 हजार किमंती चा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी माहिती दिली.


अधिक माहिती अशी की, लक्ष्मी कुरीअर मधुन काही चांदीच्या विटा चोरीला गेल्या होत्या.याची फिर्याद सदर  कुरीअर मालकांने जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल केली होती.त्या नुसार गुन्हे अन्वेषण यंत्रणेला तपास करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार तपास करीत असताना गुजरीतील एका कारागीराने चोरी केल्याचे खबरया  कडुन समजले.त्या कारागीराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले असता त्याच्या पिशवीत चोरीला गेलेल्या विटा मिळून आल्या.त्या हस्तगत करुन त्याला अटक करण्यात आली.यामध्ये पोलिस अंमलदार परशुराम गुजरे ,बांबरे ,प्रशांत घोलप ,अमर पाटील ,आदीचे सहकार्य लाभल्या चे पोलिस निरीक्षक गुरव यांनी सांगीतले .

Post a Comment

Previous Post Next Post