प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -मध्यवर्ती एसटी स्थानकातुन कोकणकडे जाणारा टाऊन हॉल हा महत्वाचा स्टॉप असून मलकापूर ,पन्हाळा ,रत्नागिरी ला जाणारा कामगार वर्ग ,शिक्षणासाठी येणारे मुले मुली साठी हा सोईस्कर आहे तसेच बाहेरुन येणारे पर्यटक कोल्हापूरात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन जोतिबा, पन्हाळा जाण्यासाठी या स्टॉप वर येतात.त्याना बसण्यासाठी सोय नसलेने स्टॉपच्या बाहेर येऊन थांबतात त्यात भर म्हणुन साईला घाणीचे साम्राज्य असून कचरा विखुरलेला असतो.
नाकाला रुमाल लावून मिळेल त्या ठिकाणी थांबतात.एसटी स्टँड मधील फरशा निघाल्या असून प्रवासी ठेचकळत पडत आहेत.संध्याकाळी तर लाईट ची सोय नसते लाईटचा पोल आहे.पण लाईटच लागत नाही.सध्या बंद अवस्थेत आहे.गर्दीच्या वेळी तर चोरटे हाथ सफाई करून पसार होतात.पावळ्यातर प्रवाशी लोकांचे फार हाल होतात.वरून पावसाचे पाणी तर एसटी स्टँड मध्ये गुडघ्याच्यावर पाणी असते. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करून ही जाणुन बुजून दुर्लक्ष होत आहे.
हा स्टॉप एसटी महामंडळाला उत्पन्न वाढ़वणारा स्टॉप असून त्याची दुरुस्ती करून घेणे ,एसटी स्टँड स्वछता राखणे हे संबंधित विभागाचे काम आहे असे प्रवासी वर्गातुन बोलले जात आहे.एखाद्या यात्रा काळात एसटी ला अमुक अमुक एवढे उत्पन्न मिळाले म्हणुन दिंडोरा पिटला जातो मग काही एसटी स्टँड च्या दुरुस्ती का होत नाहीत.प्रवाशांना सोईसुविधा का देत नाही अशी प्रवाशी वर्गातुन मागणी होत आहे. काही प्रवाशांनी संबंधित विभागाकडे दुरुस्ती विषयी,स्वछते विषयी तक्रार केली तर हे आमचे काम नाही असे उत्तर मिळते.तरी एसटी महामंडळाने लक्ष देऊन प्रवाशांच्या समस्याकडे लक्ष देऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न व्हावा अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.