प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
श्री जोतीबा डोंगरावर सासनकाठ्या व गुलाल खोबरेची उधळण करत पारंपरिक वाद्यसह हलगी, ताशाच्या तालावर डोलणाऱ्या सासनकाठ्या, गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि चांगभलं गजर अशा भक्तीमय आणि चैतन्यदायी वातावरणात दख्खनचा राजा जोतिबा यात्रा संपन्न झाली. यात्रेच्या मुख्य दिनी अर्थात बुधवारी लाखो भाविकांनी डोंगर फुलला. जोतिबाचा नावानं चागभलं गजराने सारा परिसर दुमुदुमन गेला.
मानाची सासनकाठ्यांची मिरवणूक आणि सायंकाळी गुलालाच्या उधळणीत न्हाहलेला पालखी सोहळा भाविकांनी डोळयात साठविला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील भाविक यात्रेत सहभागी झाले. गेले तीन दिवस चैत्र पोर्णिमा यात्रेसाठी भाविकांनी डोंगराकडे वाटचाल सुरू केले आहे. बुधवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पन्हाळा तहसीलदार रमेश शिंगटे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते जोतिबाच्या मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर प्रविण कापरे आणि विशाल ठाकरे यांनी जोतिबाची राजेशाही रुपातील पूजा बांधली. रात्रभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनासाठी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. भाविक गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत होते.
दुपारी दीड वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन झाले. निनाई पाडळीची सासनकाठी चांगभलंच्या गजरात मार्गस्थ झाली. सासनकाठीच्या मिरवणुकीत पाडळीचे ग्रामस्थ पांढऱ्या शुभ्र पोषाखात सहभागी झाले होते. हा नजारा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार सतेज पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री जाधव, शाहुवाडी पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगेपश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्यासह सरकारी अधिकारी उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर