स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई
प्रेस मीडिया लाईव :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी जोतीबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा दि. ०४.०४.२०२३ व दि. ०५.०४.२०२३ रोजी शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडली आहे. नमुद यात्रेकरीता येणारे भाविकांना योग्य प्रकारे दर्शन होवून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये अगर मालाविरूध्दचे गुन्हे घडू नयेत याकरीता कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता. बंदोबस्ताकरीता नेमले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी सो व कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे सो यांनी दिले सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे नियोजनबध्द बंदोबस्त केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर मार्फत जोतीबा येथील चैत्र पौर्णिमा यात्रे दरम्यान खिसेकापू, पाकिट मार अथवा दागिने चोरी होवू नये याकरीता विशेष पथके नेमली होती. सदर पथकांनी ०१ ) जोतीबा मंदीर मुख्य गाभारा, ०२ ) मुख्य मंदीर उत्तर दरवाजा, ०३) सिंधिया देवस्थान ट्रस्ट ऑफिस, ०४ )छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, ०५ ) पायरी मार्ग, मेन पेठ (दगडी कमान), ०६) सेंट्रल प्लाझा, ०७) नविन एस. टी. स्टँण्ड व ०८ ) यमाई मंदीर या गर्दीचे ठिकाणी साध्या वेषात पोलीस
बंदोबस्त नेमूण गर्दीचे ठिकाणी चोरी करणारे, चोरीचा प्रयत्न करणारे तसेच मालाविरूध्दचे गुन्हे करणे करीता संशयीतरित्या फिरणारे एकूण ८३ लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी ४७ संशयितांविरूध्द फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत व ३२ संशयीतांविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केली आहे. तसेच ०४ आरोपींकडून ०२ चैन स्नॅचिंगचे व ०४ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांचेकडून २,५०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्या मुळे मालाविरूध्दच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होवून यात्रेकरीता आले भाविकांना कोणताही त्रास न होता योग्य प्रकारे दर्शन मिळालेने यात्रा शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडली आहे. या प्रक्रियेमध्ये बंदोबस्तातील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी देखील चोख कामगिरी बजावली आहे. तसेच यात्रेत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने नेमण्यात आले मुस्कान पथक व निर्भया पथकाकडून चैत्र पौर्णिमा यात्रे दरम्यान हरविले ०६ अल्पवयीन मुलांचा तात्काळ शोध घेवून त्यांना सुखरूपपणे त्यांचे पालकांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल फुलारी साो, पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई व श्री. निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मंगेश चव्हाण सारे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती श्रद्धा आंबले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सर्व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.