स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे ( क्राईम रिपोर्टर )
कोल्हापूर : मा.पोलीस अधीक्षक, श्री. शैलेश बलकवडे सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत.
मा. वरीष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे परि. सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंग,परि. पोलीस उपअधीक्षक श्री. रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे तसेच पुरुष व महिला असे एकूण 26 पोलीस अमंलदार यांचे अवैद्य धंद्याविरूध्द प्रभावी कारवाई करणेकामी छापा पथक तयार केले. सदर छापा पथकाने दि.26.04.2023 रोजी रात्रौ उशीरा करवीर पोलीस ठाणेचे परिसरात शिंगणापूर, ता. करवीर गांवचे हद्दीत जावून शहानिशा करून गणेशनगर, शिंगणापूर, ता. करवीर येथे 03 ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणा-या भट्टयावर छापा टाकून गावठी हातभट्टया नष्ट केल्या. सदर ठिकाणी हातभट्टीची दारु तयार करणेकरीता वापरत असणारे 4,100 लिटर कच्चे रसायन, 315 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व दारु तयार करणे करीता वापरत असलेले इतर साहित्य असा एकूण 1,26,770/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर छापा कारवाईमध्ये 01 ) निखील चंद्रकांत रजपूत, व.व.21, 02) अनिकेत चंद्रकांत रजपूत, व. व. 19, 03 ) नरेंद्र मारुती गागडे, व.व. 38, सर्व रा. गणेशनगर, शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेतले असून त्यांचेसह इसम नामे अंबादास ठाकूरसिंग बागडे, रा. गणेशनगर, शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर असे एकूण चार इसमांविरुध्द भा.द.वि.स. कलम व दारूबंदी कायद्यान्वये करवीर पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. शैलेश बलकवडे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे परि. सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंग, परि पोलीस उपअधीक्षक श्री. रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शेषमोरे, विनायाक सपाटे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.