प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -गेल्या काही दिवसांपासून कंळबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल,गांजा , बॅटरी ,चार्जर सापडल्याने सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहेत.तेथे कुणाचे कुणालाच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.
येथे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने अशा गोष्टीला वाव मिळत आहे.प्लास्टीने गुंडाळलेले हे मोबाईल कारागृहाच्या भिंतीवरुन टाकल्याचे दिसून येत आहे .कंळबा जेल मधील हवालदार बांदल यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन तीन दिवसांपूर्वीच कारागृहाच्या भिंतीजवळुन एका पार्सलात दोन मोबाईल मिळाले होते.त्यानंतर दुसर्या दिवशी एका व्यक्तीने चप्पलात लपवून मोबाईल आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारयाला सुरक्षा रक्षकांनी पकडले होते.तरी सुध्दा मंगळवारी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकास चकाकणारी वस्तू हौदाजवळ आढ़ळली .ती वस्तू उचलून घेऊन वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे दिले.ते पार्सल फोडून पाहीले असता त्यात मोबाईल ,ब्यँटरी ,चार्जर मिळून आल्या.
कारागृहातील सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन पोलिसांनी काहीच्याकडे चौकशी केली असता कोणतेच धागेदोरे हाती लागले नाही. गेलया काही दिवसांपासून कारागृहात सापडत असलेल्या वस्तू याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष होतय की सुरक्षा व्यवस्थेला माहिती पडत नाही.अशी शंका मनात येवू लागली आहे.आता तरी सुरक्षा व्यवस्थेचे डोळे उघडणार का ? असा प्रश्न पडला आहे.