मुलांसाठी मोफत ज्ञान संस्कार शिबिराचे आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

येथील राजहंस फौंडेशन ( महाराष्ट्र राज्य) व हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ यांच्या संयुक्त विद्यमाने वयोगट १० ते १५ वयोगटातील मुलांसाठी सोमवार दि.१ मे ते सोमवार दि.७ मे या कालावधीत मोफत ज्ञान संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

कोवळ्या मनावर चांगले संस्कार होऊन ते नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम ठरावेत ,याच उदात्त हेतूने या शिबिरात सुभाषिते , हरिपाठ , वारकरी पावल्या , विचार पौराणिक कथांच्या माध्यमातून ज्ञानसंस्कार , पसायदान - जगण्याचा पाया , स्वयंशिस्तीचे धडे ,आई - वडीलांचा आदर आणि गुरुजनांचे महत्व याबाबत  सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय विविध मान्यवर मुलांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत.सदरचे शिबिर हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ चे पटांगणात 

दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे.तरी या शिबिरात जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.शिबिरात सहभागी होण्यासाठी 

नाव नोंदणीसाठी राजहंस फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा पैलवान (मो. ७७०९५५६९८७ ) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post