संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार प्रियाताई वैद्य , सुनिल सरवदे , दादासाहेब यादव ,दिवगंत नेते प्रा .मधूकर वायदंडे ( मरणोत्तर ) दगडू माने, शाहीर रफिक पटेल अजित गादेकर ,प्रमोद कदम यांना जाहीर
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना , संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारा संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता इचलकरंजी येथे संपन्न होणार असल्याची माहिती पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार व संघर्षनायक मीडियाचे व्यवस्थापक समिर विजापूरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार दिली आहे
पुरस्काराचे वितरण पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर ) व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतभाई मुळे , अॅड .राहूलराज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे
दयावान सरकार ग्रुपच्या धडाडीच्या नेत्या प्रियाताई वैद्य ( मुंबई ) CWC न्यूज चैनल संपादक सुनील सरवदे ,दादासाहेब यादव ( रमाई घाटकोपर नगर मुंबई ) दिवंगत नेते प्रा .मधुकर वायदंडे सर (मरणोत्तर ),शाहीर रफिक पटेल ( कोल्हापूर ) अजित दादा गादेकर (सोलापूर ) प्रमोद कदम ( अध्यक्ष महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद )ज्येष्ठ पत्रकार दगडू माने, आदिना संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर सामाजिक कार्यकर्ते जयसिंगराव कांबळे (रुई )इंजिनीयर शब्बीर फरास (जयसिंगपूर ),विद्याधर .कांबळे ( हुपरी ) ,गणेश तडाखे ( कामगार नेते ) शितल कुडचे ( पत्रकार )यांना संघर्षनायक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
यावेळी पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय प्रभारी विकास कांबळे ( आप्पा ), राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरु कट्टी , राष्ट्रीय संघटक मनोज शिंदे , राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉक्टर शिवानंद कुंभार
राष्ट्रीय कार्यकारणी सद्स्य डॉ .सतिश नगरकर , राष्ट्रीय सल्लागार अॅड . निशा गायकवाड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कैलास वानखेडे ,महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय हेगडे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडी सौ ‘ सिंधूताई तूळवे,पश्चिम मुंबई प्रदेश संघटक मीराताई बाविस्कर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा महिला आघाडी सौ . चंदाताई पाटील, कर्नाटक राज्य संपर्कप्रमुख टि के पाटील कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष उमेश सुतार, सांगली जिल्हा अध्यक्ष शुभम काळे, सांगली जिल्हा महासचिव अजय कारंडे, सांगली शहराध्यक्ष सुशांत होळकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत